महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नसल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात शिवसेनेने होर्डिंग लावले आहेत. शिवसेनेने लावलेल्या होर्डिंगमध्ये ‘असली आ रहा है नकली से सावधान’ असे लिहिले आहे. यावरुन आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरु आहे. प्रभू श्रीराम हे एका धर्माचे नाहीत. सर्वांवर त्यांचा आशिर्वाद आहे. पण कोणी नकली भावनेतून किंवा राजकारणासाठी जात असेल तर रामाचा आशिर्वाद मिळत नाही. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. आता आदित्य ठाकरे १० जूनला जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसैनिक आणि युवासैनिक जाणार आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

“उत्तर प्रदेशमध्ये असली नकलीचे बॅनर कोणी लावले त्याची माहिती नाही. पण तिथली जनता सुजाण आहे. त्यांना राजकारण फार चांगले कळते. त्यामुळे एखाद्या दौऱ्यात राजकारण असेल तर लोकांच्या मनातील भावना वेगळ्या आहेत. अशावेळी प्रभू श्रीरामाचीही इच्छा नसते. आम्ही आधीच घोषणा केल्याने १० जूनला आम्ही अयोध्येला जाणार आहोत. हा आमचा राजकीय दौरा नाही आमची श्रद्धा आहे. त्यानुसार तयारी सुरु आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “कोण विरोध करतोय, का विरोध करतोय. या वादात मी पडू इच्छित नाही. मी माझी भूमिका मांडतोय. हा राजकीय दौरा नाही. श्रद्धेपोटी अयोध्येत जाणार आहोत.”