Shiv Sena on Maharashtra Mayor Post Reservation: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. या सोडतीवर आता शिवसेनेकडून (ठाकरे) आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) माजी महापौर आणि विद्यमान गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या लॉटरी (सोडत) प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून त्याचा धिक्कार केला आहे.

सोडतीनंतर माध्यमांशी बोलत असताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी महिला ओबीसी प्रवर्गाची चिठ्ठी टाकलेली नाही. २०१७ आणि २०२२ साली महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटाचे होते. आतापर्यंत महिला ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडलेले नाही. हा ओबीसींवर अन्याय आहे.”

“निवडणूक व्हायच्या आधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती ठिकाणी आरक्षण असायला हवे, हा नियम बनवायला हवा होता. मात्र निवडणुकीनंतर आता अनुसूचित जमातीचे तीन किंवा त्यापेक्षा अधिक नगरसेवक असतील तरच आरक्षण असले पाहिजे, असा नियम बनवण्यात आला आहे. हे जाणूनबुजून केलेले आहे. मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जमातीमधून दोन नगरसेवक निवडून आले असून ते शिवसेनेचे (ठाकरे) आहेत. याचा अर्थ लॉटरी ठरवून केलेली आहे. या लॉटरी आणि निवडणूक प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो”, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर यांनी पुढे आरोप केला की, सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ पाहून सोडत काढण्यात आलेली आहे. सत्ताधाऱ्यांनी ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमातींवर अन्याय केला आहे. निवडणुकीआधी आरक्षण ठरवायला हवे होते. पण आता सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ पाहून ठरविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत एसटी प्रवर्गाचे दोन नगरसेवक आहेत, म्हणून त्यांना न्याय द्यायचा नाही का?

कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?

अनुसूचित जमाती – १
अनुसूचित जाती – ३
ओबीसी – ८
सर्वसाधारण प्रवर्ग – १७
एकूण – २९

कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?

मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)

पुणे – खुला प्रवर्ग (महिला)

पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग (महिला)

ठाणे – अनुसूचित जाती

कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती

जालना – अनुसूचित जाती (महिला)

इचलकरंजी – ओबीसी

पनवेल – ओबीसी

अहिल्यानगर – ओबीसी (महिला)

अकोला – ओबीसी (महिला)

उल्हासनगर – ओबीसी

कोल्हापूर – ओबीसी

चंद्रपूर – ओबीसी (महिला)

जळगाव – ओबीसी (महिला)

छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)

धुळे – खुला प्रवर्ग (महिला)

अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)

भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग (महिला)

मालेगाव – खुला प्रवर्ग

मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग

नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)

नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)

नाशिक – खुला प्रवर्ग

लातूर – अनुसूचित जाती (महिला)