अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पालिका अधिकाऱ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाने मारहाण केल्याची घटना मुलुंड परिसरात घडली आहे. याबाबत अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुलुंडच्या वैशाली नगर परिसरात काही अनधिकृत दुकाने पदपथावर उभी राहिल्याने यावर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या टी वॊर्डचे काही अधिकारी शनिवारी सकाळी तेथे गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आता विकासकावर झोपु योजनेतील इमारतीची दहा वर्षे जबाबदारी, गोरेगाव आगीच्या पार्श्वभूमीवर झोपु प्राधिकरणाचा निर्णय

कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकारी पुन्हा कार्यालयात परतत असताना रस्त्यात त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आनंद पवार यांनी अडवले. स्टॉलवर कारवाई केल्याने त्यांनी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी पालिकेचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साळवे यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शाखा प्रमुखाने त्यांना देखील शिवीगाळ करून थप्पड मारली. पालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शिवसेना शाखा प्रमुखावर गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader assault bmc official in mulund mumbai print news zws