मुंबई : सध्या अटकेत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना दुपारी १२ वाजता दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून हजर करण्याचे आदेश शिवडी न्यायालयाचे आर्थर रॉड कारागृहाला गुरुवारी दिले.
अटकेत असल्याने राऊत हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयत हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली होती.




याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने राऊत यांना दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून दुपारी १२ वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश आर्थर रॉड कारागृह प्रशासनाला दिले. शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे.