शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प; सर्वात मोठ्या पाईल कॅपच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण|shivdi worli elevated road project concreting work of largest pile cap completed mmrda mumbai | Loksatta

शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प; सर्वात मोठ्या पाईल कॅपच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

दरम्यान आतापर्यंत या प्रकल्पाचे अंदाजे २९ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प; सर्वात मोठ्या पाईल कॅपच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण
शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प; सर्वात मोठ्या पाईल कॅपच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

मुंबई : शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वेग दिला आहे. त्यानुसार कामातील एक एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात येत असून असाच एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पातील मोठ्या पाईल कॅप्सपैकी ए.डी. मार्ग येथील एका पाईल कॅप्सचे काम नुकतेच यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

१२.५ मी × ५.७ मी × २.५ मी च्या पाईल कॅपमध्ये एकूण १८० क्यू.मी. काँक्रिट वापरण्यात आले. तर हे आव्हानात्मक काम सलग १० तासांत पूर्ण करण्यात आले आहे. अशाच प्रकारे आता पुढील पाईल कॅप्सचे काम पूर्ण केले जाणार आहे.दरम्यान आतापर्यंत या प्रकल्पाचे अंदाजे २९ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा उन्नत रस्ता पूर्ण झाल्यास दक्षिण मुंबईतून मुंबई पारबंदर प्रकल्पावर अर्थात शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवर पोहचणे सोपे होणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 12:06 IST
Next Story
पत्नी जेवणात रोज टाकायची थोडं-थोडं विष; संपत्ती हडपण्यासाठी प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा, आरोपींना अटक