वित्त विभागाचा विरोध डावलून अनधिकृत बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देताना मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त करून सबंधित मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शनिवारी केली. दरम्यान यावरुन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना टोला लगावला आहे.

सरनाईक यांना व्यक्तिगत लाभ देऊन शपथेचा भंग; मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपची राज्यपालांकडे मागणी 

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Manoj Jarange patil,
“उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात…”, मनोज जरांगे यांचे आवाहन; म्हणाले, “मराठा समाजात…”

विरोधकांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार बर्खास्त करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी विचारलं असता ते रोज तिथे बसलेले असतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन उपयोग नाही. त्यांना लोकं विचारत नाही, इतर ठिकाणी कुठे जाऊन बोंबाबोंब करण्याची संधी नाही. त्यामुळे तिथे जातात आणि निवेदन देतात असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील; आदित्य ठाकरेंचं भाजपा नेत्यांना उत्तर, म्हणाले “राजकारणाचा खालचा स्तर…”

“पण लोकांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री या सर्वांवर जो विश्वास आहे त्याला तडा जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो. सर्व्हे पाहिला तर टॉपमध्ये येणं खूप कठीण गोष्ट आहे. अशावेळी विरोधी पक्ष फक्त रेटून खोटं बोला आणि लोकांना भरकटवा एवढंच काम करत आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

“मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यासाठी तयार”

“मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. पण आम्हीच ओमायक्रॉनमुळे काळजी घेत आहोत. विरोधी पक्ष जे काही गलिच्छ राजकारण करत आहेत त्यावर फार काही बोलायचं नाही. ते कितीही खालच्या स्तराला जाऊ शकतात. आम्ही काही त्यांच्या तोंडी लागणार नाही,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“…तर शिवसेना एक नंबर ठरेल”

आदित्य ठाकरेंच्या हस्ते त्यांच्या वरळी मतदरासंघात अनेक विकासकामांचं उद्धाटन करण्यात आलं. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “निवडणुकीत झालेल्या कामांवर रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर ठरेल. पण आम्ही निवडणुक असताना, नसताना काम करत असतो. अनेक शिवसैनिक तर तिकीटाची इच्छा न बाळगता काम करत असतात. जर असे कार्यकर्ते, पक्ष असेल तर जनतेची सेवा २४ तास होतच असते”.

“आम्ही निवडणुकांसाठी काम करत नाही. पण जेव्हा निवडणूक असते तेव्हा अर्थातच तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी काम करावं लागतं. पण आम्ही प्रत्येक महिन्यात नवीन काम करत असतो,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.