मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मग ते त्यांचं मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन असो किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधलेला निशाणा असो. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेवर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून भाजपाची बी टीम अशी देखील टीका केली जाऊ लागली आहे. यानंतर आता शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

राज ठाकरेंनी राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं आवाहन केलं होतं. मात्र, फक्त बाळा नांदगावकर वगळता खुद्द राज ठाकरेंप्रमाणेच मनसेचे इतरही अनेक नेते चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गेले नसल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर खोचक निशाणा साधला.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

“त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही”

आपण त्यांच्यावर जास्त लक्ष न देता कामावर लक्ष देत असल्याचं महापौर यावेळी म्हणाल्या. “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’… त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ. सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ मिळतोय”, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांचा राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

“भोंग्यांमधून वाढलेल्या किंमतींवर…”, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा!

“विरोधकांकडे टीका हेच शस्त्र उरलंय”

दरम्यान, यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. “विरोधकांकडे टीका करणं हेच शस्त्र आहे. त्यांना त्यांचं करत राहू देत. स्वत: आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचे इतर नेते आपापल्या परीने काम करत आहेत.