राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली आहे. या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कुर्ला येथे नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

सकाळी दहाच्या सुमारास संजय राऊत हे कुर्ला येथील नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. यावेळी नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळेस संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनीही नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

नक्की वाचा >> “नवाब मलिक डान्सबार चालवायचे, बांगलादेशमधून मुली आणून त्यांना वेश्या…”; पुरावे असल्याचं सांगत भाजपा नेत्याचा आरोप

भाजपाचे आंदोलन
दरम्यान, नबाव मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी गुरूवारी विधिमंडळाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. राज्याचे एक मंत्री तुरुंगात असूनही त्यांचा राजीनामा घेतला नाही. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार करून मलिक यांनी मुंबईरांशी गद्दारी केली असून त्यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी करीत विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी करीत सरकारला धारेवर धरले.

नक्की वाचा >> ३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

मलिक मुद्द्यावरुन कामकाज थांबवले
विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित करताच भाजपच्या सदस्यांनी फलक फडकवत आणि जोरदार घोषणाबाजी करीत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जे कधीही इतिहासात घडले नाही, ते महाराष्ट्रात घडते आहे. मंत्री मलिक तुरुंगात आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही वा त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्याच्यावर आरोप साधा नाही, तर मुंबईच्या मारेकऱ्यांशी आर्थिक व्यवहार झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एका मिनिटात अशा मंत्र्याला बाहेर फेकले असते. मलिक यांनी दाऊदच्या बहिणीशी हसिना पारकरशी व्यवहार केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना आक्षेप घेत ते कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. या गोंधळातच सरकारने दिवसाचे कामकाज उरकले.

विधान परिषदेतही गोंधळ
देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि बॉम्बस्फोटातील आरोपी शाहवली खान व सलील यांच्याशी जागेचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांची देशद्रोही प्रवृत्ती जनतेपुढे उघड झाली असून त्यांची पाठराखण करणा-या सरकारचा धिक्कार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केला. राजीनाम्याच्या मागणीवरुन विधानपरिषदेतही विरोधकांनी गदारोळ केला आणि नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत भाजपचा एल्गार सुरुच राहणार, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.