मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत भाजपातर्फे आयोजित कॅन्सरमुक्त अभियानाचा अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना खड्ड्यांवरुन नाराजी जाहीर करत हा दावा केला. दरम्यान त्यांच्या या टीकेवर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

अमृता फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील वाहतूक कोंडी घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा केला. “मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते,” असं सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात; अमृता फडणवीसांचा दावा

मनिषा कायंदे यांचा टोला –

“मामींनी एक नवीन शोध लावला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कसले बौद्धिक चालते माहिती नाही. पण एकदा असे बौद्धिकाचे सत्र अमृता फडणवीस यांच्यासाठी ठेवावं. कधी तरी मामीलाही बोलवा,” असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.

“अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, किशोरी पेडणेकरांची टीका

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टोला लगावताना “अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, असं म्हटलं आहे. “अमृता ताईंसारखी सामान्य स्त्री हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय. कारण सामान्य स्त्रिया आपण येता-जाता रस्त्यावर बघत असतो. दरवेळी उठायचं आणि वेगवेगळं काहीतरी बोलायचं. आज तर त्यांनी फारच मोठा जावईशोध लावला आहे की ३ टक्के घटस्फोट वाहतुकीच्या कोंडीमुळे होत आहेत. म्हणजे यांच्यावर आता हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे. करमणुकीचे इतर कार्यक्रम बघण्यापेक्षा भाजपाच्या इतर सामान्य स्त्रियांपासून अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित अशा सगळ्यांच्या कमेंट आपण ऐकतोय. हे सगळे जावईशोध हेच लावत आहेत”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईला बदनाम करण्याचं काम?

दरम्यान, भाजपाकडून मुंबईला बदनाम करण्याचं काम सुरू आहे, असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला. “मुंबईचे रस्ते १०० टक्के गुळगुळीत आहेत असा आम्ही कधीही दावा केला नाही. पण जिथे दिथे आम्हाला खड्डे दिसले, ते भरण्याचं आम्ही काम करत आहोत. अमृता ताईंसहित भाजपाच्या इतरांना जो काही त्रास होतोय, तो फार वेगळा आहे. त्यामुळे मुंबईला नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचं काम भाजपा करत आहे. मुंबईकर या करमणुकीच्या कार्यक्रमांनाही कंटाळला आहे”, असं महापौर म्हणाल्या.