PMLA Case, Anil Parab ED Raid: शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.

nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Shirpur sub-divisional officer
शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात
Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
pm Narendra Modi in Yavatmal
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमार्गे यवतमाळात

अनिल परबांवरील ईडी कारवाईनंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले “भाजपा रोज खड्ड्यात…”

Maharashtra Breaking News Live: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट

एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे.

अनिल परबांना तुरूंगात जावे लागणार, सोमय्यांचा इशारा

परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी व राज्यात सात ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापासत्र सुरू केले. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना सोमय्या म्हणाले, “बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे”.

ईडीने अनिल परब यांच्याविरोधात कारवाई सुरु करताच किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिक, देशमुखांप्रमाणे…”

“यशवंत जाधव यांच्या दुबई संबंधांची ईडीने चौकशी केली असून हसन मुश्रीफ व अन्य नेत्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होईल,” अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केली.