Mumbai Mahamorcha: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थिती आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिनादेखील बघणार नाही, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, “आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चाने दिला आहे.”

prakash ambedkar
लोकसभा निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, “पक्ष फोडून…”
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित
Patrolling on the Maharashtra-Karnataka border will be stricter
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गस्त अधिक कठोर करणार
Agitation of contract electricity workers in Nagpur city
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात कंत्राटी वीज कर्मचारी रस्त्यावर; ‘या’ आहेत मागण्या…

हेही वाचा- “मुख्यमंत्र्यांची ताकद पाचपखाडी अन्…”, ठाणे बंदवरून राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, “यांच्या डोक्यातील गांडूळाचा मेंदू वळवळत असतो”

“महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? एक मिनिटही त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. म्हणून हे सरकार उलथून टाकण्यासाठी हा इशारा आहे. महाराष्ट्राची ताकद काय आहे? हे आज दिल्लीसुद्धा दुर्बिणीतून बघत असेल. आज महाराष्ट्र जागा झालाय. आज महाराष्ट्र पेटलाय, ही ठिणगी पडली आहे. या व्यासपीठावर महाराष्ट्रातला प्रत्येक नेता आहे,” असंही राऊत म्हणाले.