शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या पक्षाच्या शिष्टमंडळासोबत दिल्लीत पोहोचले आहेत. किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असून शिवसेनेकडून भाजपा नेत्यांवर होणारे हल्ले, कारवाई यासंबंधी तक्रार करणार आहेत. तसंच केंद्राचं एक विशेष पथक राज्यात पाठवण्याची विनंती करणार आहे. दरम्यान किरीट सोमय्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“गेल्या दोन वर्षात भाजपाचं शिष्टमंडळ सात वेळा केंद्रीय गृहसचिवांना भेटून आलं आहे. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही प्रश्न असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना भेटायला हवं,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“मनसुख हिरेन उद्धव ठाकरेंनी घडवला”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; म्हणाले “प्रदीप शर्मांची, सचिन वाझेची….”

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे, “काही माहिती दिली तरी हरकत नाही. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात १७ बलात्कार झाले आहेत. त्यासंबंधी कोणी गृहमंत्र्यांना माहिती देत असेल तर चांगलं आहे. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्र लावा”.

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर सोमय्या दिल्लीत दाखल; अमित शाह यांच्याकडे करणार तक्रार; म्हणाले “७० गुंड दगड, चप्पल, काचेच्या बाटल्या…”

“ही सगळी ढोंगं चालली आहेत. हे दोन चार लोक जातात, दिल्लीत उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. हे महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र आहे. असंच सुरु राहिलं तर या महाराष्ट्रद्रोही लोकांना लोक चपला मारतील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय पांडे निष्पक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्यावर उगाच असे आरोप करु नयेत असंही राऊत म्हणाले.