मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांना ईडीच्या नावे धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. त्यातील किती टक्के ईडीला गेले हे ते बाहेर सांगत असतात. किरीट सोमय्या आणि त्यांचा बिल्डर मित्र अमित देसाई यांनी जमिनीच्या मालकाला ईडीच्या नावे धमकी देऊन १०० कोटींचा प्लॉट मातीमोल भावात आपल्या नावे करुन घेतला. त्यातील १५ कोटी रुपये किरीट सोमय्यांनी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला नेऊन दिले असा आणखी एक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलताना संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट करावं नाहीतर मी जाहीर करणार असा इशाराही त्यांनी दिला.

आता भाजपवर आरोपास्त्र!; फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

“”भाजपाचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार असं मी सांगितलं होतं. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. पण जसे जसे ते आतमध्ये जातील तसे तसे तुम्ही मोजत जा. सोमय्या पितापुत्र नक्कीच जेलमध्ये जात आहे. दुसऱ्यांना धमक्या देता आणि तुम्ही जेलमध्ये जा. ईडीच्या नावे धमक्या, क्रिमिकल सिंडिकेट, खंडण्या हे जे काही सुरु आहे त्याचा भांडाफोड होईल. १९ बंगले दाखवा मी सांगितलं आहे. अर्जुन खोतकर यांना ईडीने कसा आणि काय त्रास दिला हे मला माहिती आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

…मान्य करा अन्यथा मी ‘त्या’ ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

“किरीट सोमय्या तपास अधिकारी नाहीत. मी एक जबाबदार माणूस आहे. भाजपाने ते जबाबदार माणूस असून त्यांच्या आरोपांशी आपण सहमत असल्याचं जाहीर करावं. सोमय्यांनी बंगले आहेत का सांगावं, कादगपत्रं दाखवू नका. आता ते कर का भरले यावर आले आहेत. देवस्थानच्या जमिनी, बंगले, बेनामी संपत्ती कुठे आहेत हे माझे प्रश्न आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

जोड्याने मारेन म्हणणाऱ्या संजय राऊतांना किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “एक नाही तर दोन्ही जोडे…”

“दूधवाला महाराष्ट्रात येतो आणि सरकारमधून काही लोकांचे पैसे आपल्या धंद्यात गुंतवून सात हजार कोटींचा मालक येतो. अमोल काळे कुठे आहे हे मी आजही विचारतो. आमचा अंत पाहू नका, सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करणार,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.