सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मुंबईमधील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात येत आहेत. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान या धाडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“माझ्याकडे माहिती नाही. जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काही माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. यासंबंधी आपण जास्त बोलू नये. कारवाई सुरु असेल तर राज्य आणि केंद्र सरकराने एकत्रित काम करायला हवं,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Nagpur Lok Sabha seat, Allegations, Missing Voter Names, anti bjp people, Stir Controversy, polling day, polling news, nagpur poliing news, Missing Voter Names in nagpur, nagpur Missing Voter Names,
नागपुरात दडपशाही? भाजपविरोधी भूमिका मांडणाऱ्यांचे मतदार याद्यांमधून नावे गहाळ, मतदार म्हणतात…
BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?

मोठी बातमी! ईडीकडून दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये धाडी; महाराष्ट्रातील एका मंत्र्याचीही चौकशी

यामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं येत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मला माहिती नाही. नावं समोर येतील की घुसवली जातील हा महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये मोठा प्रश्न आहे. पण त्याच्यावर मी आता बोलणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता हा नाजूक आणि गंभीर विषय असतो. तपास सुरु असताना त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही”.

स्फोटक पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले “कधीतरी शिवसेनेचीही…”

“गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा झाला आहे. ईडी तिथे कधी जाणार याची वाट पाहत आहोत. दोन वर्षांपासून हा घोटाळा दाबण्याचा कोणी प्रयत्न केला? एफआयआरदेखील होऊ दिला नाही. ईडीने तिथेही जाऊन ते लोक कोण होते, आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे कोण? याचा तपास केला पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. कधीतरी शिवसेनेची पत्रकार परिषदही ऐका. सौ सोनार की, एक लोहार की…,” असं राऊत यावेळी म्हणाले. किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं.

ईडीकडून दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये धाडी

१९८० च्या दशकामध्ये भारतसोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी अबू बकारला अटक केलीय. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल २९ वर्षानंतर यंत्रणांच्या हाती लागला असून तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आलीय.