ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवतांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी काश्मीरमधील हत्यासत्रावरुन जोरदार टीका केली.

“मी मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. मोहन भागवत बरोबर बोलले,” असं संजय राऊतांनी सांगितलं. मोहन भागवत यांनी “कशाला वाद निर्माण करायचा? प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?,” अशी विचारणा नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना केली आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

ज्ञानवापी प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्रत्येक मशिदीत शिवलिंग…”

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “या देशात अनेक राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घऱात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही”.

‘कश्मीर फाईल्स २’ काढावा

“कश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आलं. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे. खरं तर आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

“काश्मीरमध्ये १९९० मध्ये होती तशीच स्थिती”

“काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. राज्यपालांसोबत गृहमंत्र्यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती. सरकार प्रयत्न करत आहे, पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.

“…तर भाजपाने संपूर्ण देशात गोंधळ घातला असता”

“आजही दोन लोकांची हत्या झाली आहे. लोकांना शोधून मारलं जात आहे. सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्याता आलेली नाही. लोकांचं स्थलांतर आणि पलायन सुरु आहे. जर इतर पक्षाच्या राजवटीत हे झालं असतं तर भाजपाने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत.