राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राज्यात सध्या एमआयएमने शिवसेनेला आघाडीसाठी ऑफर दिल्याची चर्चा असून यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा यावरुन जोरदार टीका करत असताना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं असून हा त्यांचाच कट असल्याचा आरोप केला. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरही टीका केली. तसंच अप्रत्यक्षपणे कंगना रणौतने केलेल्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला देतही टीका केली.

…मग मोहन भागवतांच्या नावापुढे ‘खान’ लावणार आहात का?; उद्धव ठाकरेंची भाजपाला विचारणा

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

‘‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असं अभिनेत्री कंगना रणौतने नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यावरून कंगना टीकेची धनी ठरली होती. तसंच तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत होती. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने हे आक्षेपार्ह विधान केलं होतं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

“देशाला सात वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्याचे तारे कोणीतरी तोडले होते. पण या गेल्या सात वर्षात काय झालं ते सांगा? काहीच नाही…मग आपल्यावर आरोप करणं…दुसऱ्यांवर देशद्रोही ठरवणं, पाकधार्जिणा, दाऊदचा हस्तक ठरवणं सुरु होतं. खरं असेल तर चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. त्यांना आपण विरोध केला होता. कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपाने एकही अवाक्षर काढलं नव्हतं. एकच आवाज तेव्हा जो होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता आणि हिंमतही नव्हती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वातंत्र्याबाबत कंगनाची मुक्ताफळे ; देशभरात पडसाद; पद्मपुरस्कार परत घेण्याची मागणी

“सत्य मांडायचं असेल तर सर्वांसमोर येऊ द्या. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन इतिहास घडवला म्हणून दंड थोपटत आहेत त्यांची नावंही काश्मिरी जनतेला माहिती नव्हती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते, दुसरं कोणीही नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.

“भाजपाचं हिंदुत्व थोतांड आहे हे जनतेला दाखवण्याची गरज आहे. पाकधार्जिणी म्हणणार असाल तर जास्त गोष्टी कोणाच्या काळात झाल्या. वाजपेयींनीच भारत-पाकिस्तान बससेवा सुरु केली होती. त्यावेळीही यावरुन टीका झाली होती. इथपासून ते नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी…हे सर्व आम्ही पाहत आहोत. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं हे पाहिलं आहे. आम्ही पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचं सोडणार नाही पण तुमचं उघडं पडलेलं जनतेला दाखवून देऊ,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“हिटरलने प्रवक्त्यांच्या चार फळ्या केल्या होत्या. आपण केलेली कामं जनतेसमोर मांडणं, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणं, विरोधकांवर आरोप करणं आणि अफवा पसरवणं या चार फळ्या होत्या आणि भाजपा यावर पावलं टाकत आहे. दुसऱ्यांबद्दल द्वेष, भीती निर्माण करणं आणि आपणच तारणहार आहोत हे बिंबवणं उत्तर प्रदेशात झालं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.