शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना कुणाची हाच प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर केला असला, तरी राजकीय आखाड्यातही पक्षावरील मालकी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटा आमनेसामने आले आहेत. याचाच भाग म्हणून दोन्ही गटांनी बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेवर दावा केलाय. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला. आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा टीझर ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये काय?

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या टीझरची सुरुवात शिवसेनेच्या भगव्या झेंड्यापासून होते. नंतर पुढे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटो दिसतो. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि मग निष्ठेचा सागर उसळणार असं लिहिलेलं दिसतं.

विशेष म्हणजे या ३५ सेकंदाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे सभेसमोर भाषण देतानाचे फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित जनसमुदायाचे चित्रणही ठळकपणे दाखवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राची ताकद दिसणार असंही म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या,” असं आवाहन केलं.

शिंदे गटाने आपल्या दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, तसेच शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ या प्रतिमांचा वापर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ,’ असा मजकूर लिहित आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे.

हेही वाचा : बाळासाहेब, वाघ, शिवसेनेसह धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर सगळी चित्रे झळकली

शिंदे गटाच्या टीझरचीही होतेय चर्चा

टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याचा उल्लेख ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ असा करण्यात आला आहे.

टीझरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती दिसते. त्यानंतर बाळासाहेबांचा मूर्ती आणि शेवटी एकनाथ शिंदेंची मूर्ती सदृश्य प्रतिमा दिसते. व्हॉइस ओव्हरमध्ये बाळासाहेबांच्या आवाजात, “शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगाव झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सातत्याने आस्मानात फडकत राहिला पाहिजे,” हे वाक्य ऐकू येतं. तसेच शेवटी, “जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्” हे सुद्धा बाळासाहेबांच्या आवाजातच ऐकू येतं. “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य,” अशी ओळ त्यानंतर झळकताना दिसते. मुख्यमंत्र्यांच्या फोटोजवळच ‘एकलव्य’ हा शब्द झकताना दिसतो. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीमध्ये लागणार आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाने आपल्या मेळाव्याला ‘शिवसेनेचा मेळावा’ असं म्हटलं आहे.

शिवसेनेची ओळख असणारा डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्या बाजूला, “गर्व से कहो हम हिंदू हैं” हे वाक्यही टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे, “शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार…” अशी ओळीही या टीझरमधील फोटोवर दिसतात. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता, बी. के. सी. मैदान, वांद्रा, मुंबई येथे हा मेळावा होणार आहे असंही व्हॉइस ओव्हरमधून सांगण्यात आलं आहे.