मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघामधील प्रभाग क्रमांक ३ चे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरात मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी एक एक करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत ३० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यातच मंगळवारी रात्री दहिसरमधील माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनीही बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक राम रेपाळे, गोरेगाव विभागाचे विभागप्रमुख स्वप्नील टेम्बवलकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – आमचा प्रश्न – दक्षिण मुंबई : जर्जर इमारती, चिंचोळ्या गल्ल्या अन् अरूंद रस्ते

हेही वाचा – प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटर हवा ? ग्राहकांना निवड करू देण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी

ब्रीद यांच्यासह त्यांचा मुलगा हृषीकेश ब्रीद, विधानसभा समन्वयक दत्ताराम काडगे, ग्राहक कक्ष वॉर्ड संघटक दत्ताराम चिंदरकर, उपशाखाप्रमुख संतोष यादव, सचिन येडेकर, अनिल बनकर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shock to thackeray group in dahisar former corporator balkrishna brid joins shivsena mumbai print news ssb
First published on: 20-03-2024 at 15:25 IST