श्रद्धा वालकर खून प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत असताना, आता श्रद्धाचे वडील विकास वालकर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यास पोहचले आहेत. श्रद्धाचा खून झाल्यानंतर फडणवीसांनी या घटनेचा सखोल तपास होईल आणि गुन्ह्यातील आरोपीला कठोर शिक्षा होईल, असं म्हटलं होतं. आता श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी तिचे वडील फडणवीसांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर श्रद्धाचे वडील विकास वालकर हे पत्रकारपरिषदही घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडणार फडणवीस त्यांना काय सांगणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

विकास वालकर सागर बंगल्यावर माझ्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. यानंतर दुपारी १ वाजता ते मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करतील.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची अलीकडेच नार्को आणि ‘पॉलीग्राफ लाय डिटेक्टर’ चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीनंतर आफताबला तिहार कारागृहात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, आफताब दररोज नवनवीन खुलासे करत आहे. आपण रागाच्या भरात श्रद्धाचा खून केल्याची कबुली आफताबने दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha murder case shraddhas father vikas walker now meets deputy chief minister fadnavis for justice msr
First published on: 09-12-2022 at 12:34 IST