मुंबई : राज्य शासनाने प्रशासनात फेरबदल करताना अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए )आयुक्तपदी श्रीधर डुबे-पाटील यांची नियुक्ती केली असून भारतीय प्रशासकीय सेवेत नव्यानेच बढती मिळालेल्या तीन अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची नेमणूक दिव्यांग कल्याण आयुक्तपदी करण्यात आली आहे.

राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांची शहरी आरोग्य आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

तर राहुल कुलकर्णी यांची नियुक्ती राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.