अभिनेत्री श्रुती हसनवर घरात घुसून हल्ल्याचा प्रयत्न!

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि प्रख्यात अभिनेते कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हिच्यावर चक्क घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका अनोळखी व्यक्तीने केला.

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि प्रख्यात अभिनेते कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हिच्यावर चक्क घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका अनोळखी व्यक्तीने केला.
सुदैवाने श्रुतीहसनने प्रसंगावधान राखून त्वरित जोर लावून सदनिकेचा दरवाजा बंद केल्याने तिच्यावरील गंभीर प्रसंग टळला. अद्याप यावर श्रुतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली नसली तरी, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज (बुधवार) ती तक्रार नोंदवू शकते.
मुंबईतील वांद्रे येथील एका इमारतीत सहाव्या मजल्यावर राहणाऱया श्रुतीच्या दरवाजाची बेल काल मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास या अनोळखी व्यक्तीने वाजवली. श्रुतीने दार उघडताच मला ओळखलेस का? माझ्याशी बोलत का नाहीस असे प्रश्न तो इसम विचारू लागला. त्यावर श्रुतीने मी तुम्हाला ओळखत नसल्याचे सांगितले. असे उत्तर मिळताच तो माणूस जबरदस्तीने तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी श्रुतीने लगेच जोर लावून दार लावून घेतल्याने गंभीर प्रसंग टळला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shruti haasan attacked by stalker at her residence in mumbai

ताज्या बातम्या