नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार राहिलेल्या शुभांगी पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.
हेही वाचा – “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील…”, शिंदे गटाच्या नेत्याचा खोचक टीका!
उद्ध ठाकरेंशी झालेल्या भेटीनंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘आज मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मी शब्दाला पक्की असते. मी त्यांना शब्द दिला होता. त्यानुसार आज मी शिवबंधन बांधले आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत मतं दिल्याबाबत त्यांनी मतदारांचे आभारही मानले.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतं मिळाली असून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी त्याचा पराभव केला. या निवडणुकीत तांबे यांना ६८ हजार ९९९ मतं मिळाली.