मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी पुन्हा खालावल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना न्यूमोनियाही झाला होता. गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. त्यांनी अन्नग्रहणही सुरू केले होते. त्यामुळे काही दिवसांत त्या घरी परततील, असे वाटत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र शनिवारी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर पुन्हा अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे डॉ. समदानी यांनी सांगितले.

buldhana murder marathi news, buldhana ambedkar jayanti murder marathi news
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल