मुंबई: शीव पनवेल महामार्गावर मंगळवारी खोदकाम करणारे यंत्र उलटे झाल्याने गेली दोन दिवस या मार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी आज तिसऱ्या दिवशी कायम असल्याचे चित्र आहे. मानखुर्द ते वाशी हे अंतर  पंधरा ते वीस मिनिटांचे आहे पण बुधवारी रात्री  हे अंतर  पार करण्यासाठी प्रवाशांना पाच ते सहा तासाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आज ही वेळ कमी झाली असली तरी अर्धा ते एक तास वाहतूक कोंडी कायम असल्याचे दिसून येते

शीव पनवेल महामार्गावर मानखुर रेल्वे स्टेशनच्या पुढे एका उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू आहे.  या  उड्डाण पुलाच्या उभारण्यात येणाऱ्या खांबांसाठी सध्या खोदकाम सुरू आहे त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरॅकेट्स लावून कंत्राटदराने रस्ता अडवला आहे. त्यामुळे तीन मार्गी का असलेल्या या मार्गावर दोन मार्गिका वर केवळ वाहतूक सुरू आहे. त्यात मंगळवारी खोदकाम करणारे यंत्र (जेसीपी) उलटे झाल्याने या मार्गावर मंगळवारपासून वाहतूक कोंडी सुरू झाली आहे.बुधवारी हे खोदकाम करणारे यंत्र हटवण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली.

त्यामुळे मानखुर ते वाशी या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल पाच ते सहा तास वाहन चालकांना ताटकळत राहावे लागले. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहन चालकांनी गाड्या गोवंडी, देवनार मधील  अंतर्गत मार्गांचा उपयोग केला तसेच काही वाहन चालकांनी पुण्याकडे जाण्यासाठी अटल सेतू मार्गाचा वापर केला त्यासाठी त्यांनी  चेंबूर येथूनच उलटा प्रवास सुरू केला. या मार्गावरील वाहतूक कोंडी बुधवार पेक्षा कमी झाली असली तरी ती आजही कायम आहे त्यामुळे मानखुर्द ते वाशी गाडी उड्डाणपूल आज दुपारी वाहतूक कोंडी असल्याचे दिसून आले मोठा असलेला हा रस्ता उड्डाणपूलाच्या कामासाठी छोटा करण्यात आल्याने ही वाहतूक कोंडी यापुढे कायम राहणार असे दिसून येते.