मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये शीतल म्हात्रे, पारूल मेहता, नैना दोशी, अजंता यादव, अनिता यादव आणि वकारुन्निसा अन्सारी या नगरसेविकांचा समावेश आहे.
सहा ‘गोंधळी’ नगरसेविका निलंबित
या नगरसेविकांनी सभागृहामध्ये रोपे आणली होती. ती महापौरांसमोर ठेवत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या सहा नगरसेविकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या नगरसेविकांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली आणि सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्वाईन फ्लूवर झाडे लावण्याचा उपाय सुचविला होता. त्यांच्या या अजब उपायाचा निषेध करण्यासाठीच या नगरसेविकांनी सभागृहात रोपे आणून ती महापौरांसमोर ठेवल्याची माहिती मिळाली.