वांद्रे पश्चिम येथील महाराष्ट्र नगरातील एक मजली इमारत मंगळवारी मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ महिन्यांच्या मुलीसह सहा जण जखमी झाले.
वांद्रे बस आगाराच्या पाठीमागील ही इमारत रात्री सव्वाबाराच्या सुमारास कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले.
या दुर्घटनेत सबीना यास्मीन (४०), मुक्तार शेख (४०), नेमान शेख (४), नर्गीस मुक्तार शेख (८), मायरा मुक्तार शेख (९ महिने), हसिना मुक्तार शेख (२५) जखमी झाले. जखमींना वांद्रे भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.