मुंबईः महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे कारवाई करून सहा जणांना अटक केली. त्यातील तिघे विमानतळावर कार्यरत आहेत. आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅ्म सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १० कोेटी रुपये आहे.

डीआरआयच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मुंबई विमानतळावर सापळा रचला. त्यांनी विमातळावर कामाला असलेला रोहन चव्हाण (२०) याचा माग काढला. चव्हाण सोने तस्करी करणाऱ्या टोळीला मदत करत असल्याचा डीआरआयला संशय होता. त्यांनी अंधेरी पूर्व येथील सहार गावपर्यंत चव्हाण याचा पाठलाग केला. त्यावेळी तो तीन संशयीत अर्शद शेख (२६), अरबाज तांबोळी (२१) आणि अनस पटेल (२६) यांना भेटल्याचे निदर्शनास आले. त्या माहितीच्या आधारे सर्वांना ताब्यात घेण्यात आले. रोहन चव्हाण त्यांना सोन्याच्या १९ कॅप्सुल देण्यासाठी तेथे आला होता. त्या कॅप्सुलमध्ये मेण भरले होते. त्यात सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान अनिल चव्हाण (२९) आणि विवेक रेवळे (३६) यांची नावे डीआरआयला समजली. अनिल व रेवळे सोने घेऊन तेथे येणार असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. त्या माहितीच्या आधारे डीआरआयने पुन्हा सापळा रचला. त्यात रेवळे व अनिल यांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडूनही सोन्याच्या १२ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. त्यातही मेणात सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी ९५ लाख रुपये आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Moneyedge Group financial scandal news in marathi
१०० कोटींच्या फसवणुकीबद्दल तक्रार ‘मनीएज’च्या दोन संचालकांना अटक; ‘टोरेस’नंतर आणखी एक घोटाळा
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक

हेही वाचा >>>न्यायालयाच्या आवारातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील बंदी मागे घ्या; वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी

आरोपी सराईत टोळीशी संबंधीत आहेत. विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांनी हाताशी धरून ते तस्करीचे सोने विमातळाबाहेर काढायचे. या टोळीच्या इतर सदस्यांचीही माहिती मिळाली आहे. आरोपींचे बँक खाते व मोबाईलची माहिती घेण्यात आली असून त्याद्वारे डीआरआय अधिक तपास करत आहे. आरोेपींचे मोबाइल संच पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडून आरोपींच्या बँक खात्यात झालेल्या व्यवहारांची माहिती घेतली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोपी सोन्याची तस्करी करत आहेत. तसेच आरोपींच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे.

Story img Loader