शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी अत्यंत हुशारीने वरळी विधानसभा मतदारसंघाची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या उमेदवारीच्या निमित्ताने वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पावरही शिवसेनेला ‘देखरेख’ ठेवणे शक्य होणार आहे.

वरळी, नायगांव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडीतील बीडीडी चाळीचा एकत्रित पुनर्वकिास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुनर्वकिासासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च होणार असले तरी या प्रकल्पामुळे म्हाडाला १५ हजार कोटींचा आíथक लाभ होऊ शकेल असा दावा पुनर्वकिासाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारने जागतिक निविदा मागवलेल्या असल्या तरी स्थानिकांचा विरोध होत असल्याने हा प्रकल्प रखडलेला आहे.

बीडीडी चाळींच्या पुनर्वकिासाला कितीही विरोध होत असला तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमली पण, त्यात शिवसेनेला शिरकाव करू दिला गेला नाही. या समितीत शिवसेना एकही प्रतिनिधी नाही.

चार सदस्यांच्या समितीत मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वरळीतील भाजप नेते सुनील राणे आणि अतिरिक्त गृहसचिव यांचा समावेश आहे. वरळी, शिवडीसारख्या मराठी तोंडवळा असलेल्या भागांमधील पुनर्वकिासातील कामांपासून शिवसेनेलाच बाजूला काढण्याची खेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पण, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले तर मात्र बीडीडी चाळींच्या विकासकामांमध्ये शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला सहभागी करून घ्यावे लागेल, असा शिवसेनेचा होरा आहे.

जमिनींच्या आकाशाला भिडलेल्या किमती पाहता या प्रकल्पाची उलाढाल तीन लाख कोटींची आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात वरळी, डिलाई रोडवरील अनुक्रमे ५७ एकर आणि १३ एकर अशी ७० एकर जमीन येते. पण, या जमिनीच्या विकासामध्ये शिवसेनेला विचारात घेण्यात आला नाही.

वांद्रे-पूर्व मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहिलेले नाहीत, ते वरळी मतदारसंघातूनच उभे राहिले आहेत. या मतदारसंघातून विजयी झाले तर बीडीडी चाळीच्या प्रश्नात लक्ष घालावे, असा मुद्दा बीडीडी चाळीच्या रहिवाशांच्या आंदोलनातील नेते आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते आयात करून शिवसेनेने वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी ‘सुरक्षित’ केला गेला आहे, असा दावाही वाघमारे यांनी केला.

वरळी, नायगांव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडीममधील १६ हजार कुटुबांना घरे दिली जाणार आहेत. ५०० चौरस फुटाचे घर रहिवाशांना मिळेल. १९२१ ते२५ काळात बांधलेल्या या बीडीडी चाळीतील सर्वाधिक १२१ इमारती वरळीमध्ये आहेत. नायगांवमध्ये ४२, एन एम जोशी मार्गावर ३२ तर शिवडीमध्ये १२ इमारती आहेत. एकूण ९२.८२ एकराचा सात वर्षांमध्ये विकास करण्याचे लक्ष फडणवीस सरकारने ठेवलेले आहे. ६८ टक्के जमीन निवासासाठी आणि उर्वरित जमीन व्यापारी तत्त्वावर विकसीत होणार आहे.