ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याआधीही ठाण्यातील एका व्यक्तीकडून त्यांना धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता थेट लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने संजय राऊतांना धमकी आल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया उमटत असताना खुद्द संजय राऊतांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी धमकी प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणी दिली धमकी?

संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या मोबाईल फोनवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊतांनी त्यांना आलेल्या धमकीप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल केली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने ही धमकी देण्यात येत असल्याचं मोबईलवर आलेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच, दिल्लीत एके ४७ रायफलने गोळ्या घालण्याची धमकी मेसेजमध्ये देण्यात आली आहे.

संजय राऊत म्हणतात, “धमक्या येत असतात”

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी अशा धमक्यांबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका केली आहे. “धमक्या येत असतात. पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचं सरकार गांभीर्यानं घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी लावल्यामुळे महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut: “सिद्धू मुसेवालाप्रमाणेच…”, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

“मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार अशा गोष्टी आपण पाहात आहोत. पोलीस अधिकारी वैभव कदम यांनी केलेली आत्महत्या असे प्रकार रोज घडत आहेत. पण राज्याच्या मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना त्याकडे पाहायला वेळ नाही. आम्हाला आलेल्या धमक्यांची माहिती जेव्हा आम्ही देतो, तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात की हा स्टंट आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊतांनी पोलिसांचे मानले आभार

“मला कळलंय की सलमान खानला ज्यांनी धमकी दिली, त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आली आहे. त्यातल्या काहींना पकडलंय असंही माझ्यापर्यंत आलंय. असं झालं असेल, तर त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी त्यावर पोलिसांचे आभारही मानले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snjay raut slams cm eknath shinde devendra fadnaivis on lawrence bishnoi life threat message pmw
First published on: 01-04-2023 at 10:37 IST