सोमय्यांकडून मुश्रीफांविरोधातील कागदपत्रे प्राप्तीकर विभाग व ईडीकडे सादर

किरीट सोमय्या यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांचीही भेट घेऊन त्यांनाही याप्रकरणी कारवाईच्या सूचना देण्याची विनंती केली.

Kirit-Somaiya

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांचीही भेट घेऊन त्यांनाही याप्रकरणी कारवाईच्या सूचना देण्याची विनंती केली. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला असून मुश्रीफ यांनी १०० कोटी रुपयांचा दावा न्यायालयात सादर करण्याचा इशारा दिला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सोमय्या यांना बदनामीबद्दल कायदेशीर नोटीस बजावली असून १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. पण त्याला मी किंमत देत नसून सहा नेत्यांनी अशा नोटिसा दिल्या असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. माझ्या मुलाला तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न झाला, पत्नी मेधा सोमय्यांच्या मागे चौकशी लावण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांनी केला. पण मी त्याला घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Somaiya submits documents against mushrif to income tax department and ed akp