मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने उपनगरातील १२ भूखंडांची लवकरच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि इतर वापरासाठीचे आरक्षण या भूखंडांवर आहे. या भूखंडांच्या विक्रीसाठी येत्या महिन्याभरात स्वारस्य निविदा काढण्यात येणार आहेत. तर भूखंडांच्या विक्रीतून मुंबई मंडळाला मोठा निधी मिळण्याची शक्यता असून त्यामुळे मंडळाच्या तिजोरीत निधीची भर पडणार आहे. 

मुंबईमध्ये म्हाडाच्या मालकीचे अनेक आरक्षित भूखंड आहेत. आरक्षणानुसार या भूखंडांचा वापर करणे बंधनकारक आहे. मुंबई मंडळ अशा भूखंडांचा शोध घेऊन त्यांची विक्री करते. निविदा काढूत, राखीव रक्कम निश्चित करून हे भूखंड दिले जातात. आतापर्यंत असे शेकडो भूखंड मंडळाने विकले आहेत. यातून येणारी रक्कम मंडळाच्या गृहप्रकल्पांसाठी वापरली जाते. आता मंडळाने उपनगरातील १२ भूखंड शोधून काढले आहेत. या भूखंडांच्या विक्रीसाठी येत्या महिन्याभरात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

मालाड मालवणी येथील तीन भूखंडांचा त्यात समावेश असून हे भूखंड शाळेसाठी आरक्षित आहे. तसेच येथील अन्य एक भूखंड महाविद्यालयासाठी, तर एक भूखंड रुग्णालयासाठी आरक्षित आहे. त्याचबरोबर िदडोशी, कुर्ला नेहरू नगर, कुर्ला विनोबा भावे नगर, चारकोप, गोराई, आकुर्ली येथील प्रत्येकी एका भूखंडाचाही त्यात समावेश आहे. ओशिवरा येथे सर्वात मोठय़ा भूखंडाचाही यात समावेश आहे. सर्व भूखंडांच्या विक्रीसाठी स्वारस्य निविदा मागविण्यात येणार आहेत. आरक्षणानुसार संबंधित भूखंडाच्या निविदा प्रक्रियेत सरकारची मान्यताप्राप्त संस्थांना सहभागी होता येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.