मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे व्यवस्थापन मार्गदर्शक अनिल देसाई आणि तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी उत्सुक असलेले राहुल शेवाळे यांच्यात दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात थेट लढत झाली. १४ लाख ७४ हजार ४०५ मतदारांपैकी ७ लाख ९० हजार ३३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सायन कोळीवाडा, वडाळा, चेंबूर या ठिकाणी मतदारांनी तीन तासांपेक्षा जास्त काळ उन्हातान्हात उभे राहून केलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे. याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना धारावी मतदारसंघात सर्वाधिक मतदान होईल, अशी ग्वाही देणाऱ्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात एक लाख २२ हजार ८७० मतदान (४८.५२ टक्के) झाले आहे.

हेही वाचा >>> मागोवा : मराठी-मुस्लीम मतदार निर्णायक

fadanvis
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
anna bansode
“विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मात्र मी…”, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंचं ठरलं
Shivsena, claim, Murbad Constituency,
शिवसेनेचा मुरबाड मतदारसंघावर दावा, वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारीसाठी वरिष्ठांकडे साकडे
Wardha, Legislative Assembly,
वर्धा : तळ्यात मळ्यात ! विधानसभेसाठी दोन तगड्या उमेदवारांची राजकीय पक्ष की अपक्ष अशी दुविधा
Minor girl raped by BJP leader
भाजपा नेत्यावर अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि खूनाचा आरोप; पक्षातून हकालपट्टी
Controversy in Nashik Teacher Constituency election due to distribution of money outside the Centre
केंद्रापर्यंत प्रलोभने अन् मतदानासाठी रांगा; केंद्राबाहेर पैसे वाटपाने नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक वादात

महाविकास आघाडीसाठी ही चिंतेची बाब आहे. धारावीचे बदलते वारे पाहून शेवाळे यांनी मी पण धारावीकर मोहीम राबवली होती. वडाळा मतदारसंघात एक लाख १५ हजार ५०८ मतदान झाले आहे. पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी हवी असल्यास मतांची टक्केवारी चांगली राहील यांची काळजी आमदारांनी घेतली आहे. सायन कोळीवाडा भाजपचे आमदार कॅप्टन सेल्वन यांच्या सायन मतदारसंघात एक लाख ४२ हजार १२६ मतदान झाले आहे. जास्त झालेले मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडणार आहे. यावरून निकालाची दिशा ठरणार आहे. ठाकरे यांचे निकटवर्तीय देसाई यांच्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांनी अनेक सभा तसेच रोड शो केले. शिवसेनेसाठी महत्त्वाचा असलेला दादरचा परिसर याच मतदारसंघात येतो.

अणुशक्तीनगर, वडाळा, धारावी, चेंबूर हे विधानसभा मतदारसंघ कष्टकऱ्यांच्या वसाहती आहेत. भाजपला बहुमत मिळाल्यास संविधान बदलणार हा प्रचार या मतदारसंघातील दलित मतदारांच्या मनावर बिंबवण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला. अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक हे तटस्थ राहिल्याने येथील मुस्लीम समाजाचा कल कुठे झुकणार याची उत्सुकता आहे. माहीम मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि मनसे यांची संमिश्र ताकद आहे. मनसेचे पदाधिकारी वगळता कार्यकर्ते किती फिरले यावर महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित जुळणार आहे. माहीम मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला आहे.