उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दक्षिण मुंबईतील ज्वेलरला पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू भौमिक असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने आठ वेळा रुग्णालयात फोन करुन मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारु अशी धमकी दिली. फोन करताना त्याने आपलं नाव ‘अफजल’ असल्याचं सांगितलं होतं.

१५ ऑगस्टला मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकीचे अनेक फोन आले. हे सर्व फोन रिलायन्स फाऊंडेशनच्या हरकिशनदास रुग्णालयात सकाळी १०.३० च्या सुमारास आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, विष्णू भौमिक याने एका कॉलमध्ये धीरुभाई अंबानी यांचाही उल्लेख केला.

Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
The Wadhawan brothers in DHFL fraud
‘डीएचएफएल’च्या वाधवान बंधूंच्या बँक, डीमॅट खात्यांवर टाच 
Uddhav thackeray on farmer protest
“शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी, इतका जोश चीनच्या सीमेवर दाखवला तर…”, ठाकरे गटाचा संताप
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…

‘तीन तासांत ठार करणार’; मुकेश अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

दहिसरचा रहिवासी असणाऱ्या विष्णू भौमिकच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलीस चाचपणी करत आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही राष्ट्रीय तपास यंत्रणांनीही या प्रकरणाची माहिती मागवली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

“संशयिताने मुंकेश अंबानी यांना धमकी दिली होती, तसंच शिवीगाळही केली होती. त्याला अटक करण्यात आली आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या संशयिताची चौकशी करत असून, प्रकरणाचा तपास सुरु आहे.

गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात, मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एक एसयुव्ही सापडली होती. या गाडीमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती. यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी काही पोलीस अधिकारी अटकेत आहेत.