मुंबई: कुलाबा ते शिवडीदरम्यानच्या टापूत पसरलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातील छोट्या छोट्या विभागांमध्ये शिवसेनेने बस्तान बसवले. २०२२ शिवसेनेची शकले झाल्यानंतर या मतदारसंघामधील काही विशिष्ट भागातील समीकरणे बदलली होती. परंतु त्याही परिस्थितीत शिवसेनेने (उद्धव ठाकरे) दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांत आपले वर्चस्व कायम राखले.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, शिवडी आणि भायखळा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल हे एकेकाळचे काँग्रेसचे बालेकिल्ले. त्याशिवाय दक्षिण मुंबईतील मुस्लीमबहुल भागातील मतदारही मोठ्या संख्येने काँग्रेसच्या पाठीशी होते. त्यामुळेच लोकसभेच्या १९८४, १९९६, १९८९ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते मुरली देवरा यांचा विजय सुकर झाला होता.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
Uddhav Thackeray Shiv Sena Will Contest Local Body Polls Alone Sanjay Raut
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, विरोधकांची टीका
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश

हेही वाचा – वायव्य मुंबई : वर्सोवा पुन्हा ठाकरेंकडे, तर अंधेरी पूर्व एकनाथ शिंदेकडे

बाबरी मशीद व राम जन्मभूमीवरून घडलेल्या घटनांचे पडसाद दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातही उमटले आणि १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जयंतीबेन मेहता यांनी मुरली देवरा यांचा पराभव केला. मात्र, लोकसभेच्या १९९८ मधील निवडणुकीत मुरली देवरा यांचा विजय झाला. त्यानंतर सलग २००४ आणि २००९ मधील निवडणुकीत मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी हा मतदारसंघ राखला. मात्र २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत शिवसेना-भाजप युतीचे अरविंद सावंत विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीतही अरविंद सावंतच विजयी झाले. दरम्यानच्या काळात युतीत झालेली बिघाडी, शिवसेना-भाजपने परस्परांशी घेतलेली फारकत, शिवसेनेची शकले झाल्यानंतर बदललेली समीकरणे अशी पार्श्वभूमी असताना मुस्लीमबहुल भागातून पारड्यात पडलेल्या मतांमुळे २०२४ च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

विधानसभेच्या मागील निवडणुकीत विजय मिळालेले वरळी, शिवडी आणि भायखळा विधानसभा मतदारसंघ राखण्यात शिवसेनेला (उद्धव ठाकरे) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत यश आले. शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. महायुतीने शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मिलिंद देवरा, तर मनसेने संदीप देशपांडे यांना मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले होते. मात्र मतदारांनी आदित्य ठाकरे यांच्या पारड्यात मतांचे दान टाकले आणि ते ८,८०१ मताधिक्याने विजयी झाले. त्यांना एकूण ६३ हजार ३२४ मते मिळाली. तर काँग्रेसमध्ये असताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदारसंघात ५४,५२३ मते मिळाली. तर संदीप देशपांडे यांना केवळ १९,३६७ मते मिळाली.

शिवडी मतदारसंघातील उमेदवारीवरून शिवसेनेमध्ये (उद्धव ठाकरे) काहीसा संघर्ष झाला होता. उमेदवारीसाठी विद्यामान आमदार अजय चौधरी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी इच्छुक होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांची समजूत काढून अजय चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. तर मनसेने बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देऊन कडवे आव्हान निर्माण केले होते. मात्र अजय चौधरी ७४ हजार ८९० मते मिळवून सात हजार १४० मताधिक्याने विजयी झाले. बाळा नांदगावकर यांना ६७ हजार ७५० मते मिळाली.

विधानसभेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने (शकले होण्यापूर्वी) यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली होती. मुस्लीम मतदारांच्या पाठिंब्यामुळे यामिनी जाधव यांचा विजय सुकर झाला होता. मात्र, शिवसेनेची शकले झाल्यानंतर यामिनी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) यामिनी जाधव यांना नुकत्याच झालेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र मतदारांनी नाकारल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली.

महायुतीतील शिवसेनेने (एकनाथ शिंदे) यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघातून उमेदवारी दिली, तर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) माजी नगरसेवक मनोज जामसूदकर यांना रिंगणात उतरविले. अखेर जामसूदकर ८०,१३३ मते मिळवून ३१,३६१ मताधिक्याने विजयी झाले. यामिनी जाधव यांना ४८ हजार ७७२ मते मिळवून पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – उत्तर मुंबई : भाजपचा बालेकिल्ला अबाधित

मलबार हिल आणि कुलाबा हे दोन्ही गड भाजपचे राखले. महायुतीचे उमेदवार भाजप आमदार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडीचे नवखे उमेदवार भैरुलाल जैधरी (जैन) यांना पराभवाची धूळ चारत विधानसभा निवडणुकीत सात वेळा निवडून येण्याचा मान पटकावला. मंगलप्रभात लोढा तब्बल एक लाख एक हजार १९७ मते मिळवून ६८ हजार ०१९ मताधिक्क्याने विजयी झाले. तर भैरुलाल चौधरी जैन यांच्या पारड्यात अवघी ३३ हजार १७८ मते पडली.

कुलाबा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडातील काँग्रेसने यापूर्वी दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले हिरा देवासी यांना कुलाब्यातून उमेदवारी दिली होती. कुलाब्यातही हिरा देवासी यांना ॲड. राहुल नार्वेकर यांनी धूळ चारली. ॲड. राहुल नार्वेकर ८१ हजार ०८५ मते मिळवून तब्बल ४८ हजार ५८१ मताधिक्क्याने विजयी झाले. तर हिरा देवासी यांना ३२ हजार ५०४ मते मिळाली.

Story img Loader