मुंबई : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा जाऊन मोठ्या प्रमाणात जलवाहिनीला बुधवारी रात्री गळती लागली. महानगरपालिकेने तातडीने दुरूस्तीकाम हाती घेतले. यासाठी गुरुवारी दक्षिण मुंबईतील पालिकेच्या ‘डी’, ‘ई’ आणि ‘जी दक्षिण’ विभागांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला होता. तसेच, काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. संबंधित काम गुरुवारी होणे अपेक्षित होते, मात्र दुरुस्तीच्या कामाचे स्वरूप मोठे असल्याने शुक्रवारी देखील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बाधित होणारे परिसर
१) डी विभाग : लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बलराम स्ट्रीट, डॉ. डी. बी. मार्ग, पाथे बापूराव मार्ग तसेच, संपूर्ण मुंबई सेंट्रल परिसर. (शुक्रवार, ८ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे) ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड, खाडिलकर रोड (पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येईल)
गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड, चौपाटी रोड (पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येईल) एम. पी. मिल्स कंपाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव (पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे) आंबेडकर नगर कॉलनी, केशवराव खाड्ये रोड (दक्षिण) (पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे)
२) ई विभाग : एम.एस.अली मार्ग, बेलासीस मार्ग, कामाठीपुरा, शंकरराव पुपला मार्ग, शुक्लाली स्ट्रीट, मानाजी राजुजी मार्ग, मोरलॅड मार्ग, आग्रीपाडा मार्ग, सातरस्ता जंक्शन, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, एम.ए. मार्ग, डॉ. आनंदराव नायर मार्ग, नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जगजीवन राम रुग्णालय, वॉक्हार्ड रुग्णालय (शुक्रवार, ८ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे) ३) जी दक्षिण विभाग : सातरस्ता परिसर, जे. आर. बोरीचा मार्ग, साने गुरुजी मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग, धोबीघाट, जी.बी सपकाळ मार्ग, डॉ. ई. मोझोसमधील काही परिसर (पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)
