scorecardresearch

स्पेशल २६ आंबिवली मुंबई पोलिसांची धाडसी कारवाई

मुंबई पोलिसांच्या २६ पोलिसांच्या पथकाने इराणी वस्तीत शिरूण मोठ्या शिताफीने सराईत आरोपीला अटक केली.

Sanga Zakir Farjad Syed
आरोपी मोहम्मद ऊर्फ संगा जाकिर फर्जद सय्यद

मुंबई पोलिसांच्या २६ पोलिसांच्या पथकाने इराणी वस्तीत शिरूण मोठ्या शिताफीने सराईत आरोपीला अटक केली. या पथकाने या वस्तीत शिरण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर केला. अटक आरोपीविरोधात गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथे २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.मोहम्मद ऊर्फ संगा जाकिर फर्जद सय्यद असे अटक आरोपीचे नाव असून त्याविरोधात गुजरात, महाराष्ट्र तसेच युपी येथे मिळून २७ जबरी चोरी व बतावणी चे गुन्हे आहेत. २०२१ मध्ये गुजरात पोलीसांनी आरोपीवर मोक्का कायदयांतर्गत कारवाई केली होती. त्याप्रकरणी तो जामिनावर सुटलेला आहे. आरोपीविरोधात बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>>पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली; सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संशयीत आरोपी इराणीमशिदीच्या बाजूला चहाच्या टपरीवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .मोहिम पूर्ण करण्यासाठी तात्काळ चारकोप पोलीस ठाणे बोरवली पोलीस ठाणे व मालाड पोलीस ठाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथक असे एकूण २६ जणांचे पथक तयार करण्यात आले.

आंबिवली गावात जाण्यासाठी दोन रुग्णवाहिकांचा आणि दोन खासगी वाहनांचा वापर करण्यात आला. सोबत पिस्तुल, लाठ्या नेण्याचेही नियोजन पोलिसांनी केले. गावाबाहेर पोहोचल्यावर २६ जणांचे चार वाहनांचे तीन पथकांमध्ये विभाजन करण्यात आले. एका पोलीस पथकाने रुग्णवाहिकेतून इराणी वस्तीमध्ये प्रवेश केला. रुग्णवाहिका येताना दिसताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला व पूर्ण वस्तीमध्ये पोलीस आल्याचा आरडाओरडा सुरू केला . इराणी वस्तीत गोंधळ सुरू झाला. दुसऱ्या पथकाने आरोपीला पळताना पाहिले. आरोपीवर झडप टाकून त्याला पकडले .आरोपीला पकडल्यानंतर रहिवाशांनी दंगा, आरडाओरडा करून पूर्ण पथकास घेरले आणि दगड फेकण्यास सुरुवात केली . आरोपीला पळण्यास मदत करू लागले. पण पोलिसांनी सतर्कता दाखवून जमलेल्या लोकांना व महिलांना बाजूला केले. खूप मोठ्या प्रमाणात पोलीसांच्या गटावर दगडफेक केली. पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला तरीही पोलीसांनी आरोपीला सोडले नाही. मोठ्या अवघड परिस्थितीतून इराणी वस्तीतून आरोपीला पकडण्यात यश आले.

हेही वाचा >>>बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये; मदत की कर्ज याबाबतचा निर्णय लवकरच राज्य सरकारकडून

आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये आत्तापर्यंत कोणत्याही पोलिसांनी येऊन येथील आरोपीस अटक करण्याचा प्रयत्न केल्यास वस्तीवरील सर्व महिला एकत्र येऊन पोलिसांना घेराव घालून, दगडफेक करून आरोपीस घेऊन जाण्यास विरोध करतात. कोणत्याही आरोपीला इराणी वस्तीमधून कुणीही पोलीस घेऊन जाऊ शकत नाहीत. यापूर्वी अशा प्रकारच्या जितक्या कारवाया झाल्या त्या कारवायांमध्ये पोलिसांना अपयश आले होते. पोलीस मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 10:14 IST
ताज्या बातम्या