कर्जत स्थानकादरम्यान गर्डर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रविवार मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. पळसदरी व भिवपुरी स्थानकादरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ३.२० या वेळेत दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात येणार असून लोकल गाडय़ा अंशत रद्द करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी-माहिमस्थानकादरम्यान अप मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०वाजेपर्यंत तर डाऊनवर सकाळी ११.४० ते दु. ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील ब्लाक काळात काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जतला जाणारी दुपारी १.४० वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुपारी १२.५०, १.१५ आणि ३.२७ वाजताची कर्जत ते खोपोली लोकल, दुपारी १.५०वाजताची खोपोली ते छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकल, सकाळी ११.३०, दुपारी १२.४०आणि दु.२.५० वाजताची खोपोली ते कर्जत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

भिवपुरीपर्यंत चालण्यात येणाऱ्या लोकल
* कल्याण-कर्जत स. ११.१७ वा.
* छत्रपती शिवाजी टर्मिनस-कर्जत सकाळी ९.३७ , सकाळी १०.३७ ,सकाळी ११.१५, दुपारी १.१५ वा.
* ठाणे-कर्जत दुपारी १२.११वा.
* छत्रपती शिवाजी टर्मिनस- खोपोली दुपारी १२.२२ वा.
* कर्जत-ठाणे दुपारी १२.२१ वा., दुपारी १.२७ वा.
* कर्जत-छत्रपती शिवाजी टर्मिनस- सकाळी ११.१९ ,दुपारी १२.०१, दु.१, दु. १.५७ वा., दुपारी ३.१९ वाजता सुटेल, असे सांगण्यात आले.