scorecardresearch

नवाब मलिक यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी मान्य; वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर ईडीच्या या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली.

नवाब मलिक यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी मान्य; वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
नवाब मलिक

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले आणि सध्या खासगी रुग्णालयात दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मंडळाद्वारे वैद्यकीय तपासणी करण्याची अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) मागणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी मान्य केली. तसेच जेजे रुग्णालयाला त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मंडळ स्थापन करण्याचे आणि १० दिवसांत मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

मलिक काही महिन्यांपासून मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांची खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली असून सध्या ते उपचार घेत आहेत. मात्र कारागृहातील वास्तव्य टाळण्यासाठी मलिक हे खासगी रुग्णालयात दाखल असल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच मलिक यांची वैद्यकीय स्थिती नेमकी काय आहे हे तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मंडळ स्थापन करण्याची मागणी ईडीने विशेष न्यायालयाकडे केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर ईडीच्या या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने ईडीची मागणी मान्य केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 02:07 IST

संबंधित बातम्या