मुंबई : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीला उपस्थिती लावली म्हणजे कटात सहभागी असणे होत नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आरोपी असलेल्या प्रकरणातील आरोपी अविन साहू याला जामीन मंजूर करताना नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणातील आर्यनची भूमिका ही साहूपेक्षा वेगळी आहे, असेही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. साहूसह न्यायालयाने मनीष राजगरिया यालाही जामीन मंजूर केला होता. साहू याला जामीन मंजूर करणाऱ्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली.

या प्रकरणी अटकेत असलेले सगळे २० आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते, असा एनसीबीचा दावा आहे; परंतु साहू अन्य आरोपींच्या संपर्कात असल्याचा एकही पुरावा एनसीबीने सादर केलेला नाही. त्यामुळे त्याची क्रूझवर उपस्थिती असणे हे तो कटात सहभागी असल्याचे म्हणता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने साहूचा जामीन अर्ज मंजूर करताना म्हटले.

वानखेडे यांच्यावर मलिक यांचे आणखी आरोप

क्रू झवरील पार्टीत सहभागी असलेला आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ माफिया अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे  विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचा  आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी के ला. तसेच वानखेडे यांचा पहिला विवाह मुस्लीम पद्धतीने झाल्याचे प्रमाणपत्रच (निकाहनामा) मलिक यांनी सादर के ला. क्रू झवर कारवाई झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचा माफिया तेथे उपस्थित होता. या माफियाची वानखेडे यांच्याशी मैत्री असल्यानेच त्याला कारवाईतून वगळण्यात आल्याचा आरोपही मलिक यांनी के ला. समीर वानखेडे व त्यांच्या वडिलांनी सारे आरोप फे टाळून लावले. आई मुस्लीम होती व तिच्या शब्दाखातर आपण मुस्लीम पद्धतीने विवाह के ला होता, असे वानखेडे यांनी सांगितले.

पुरावे मलिकांनी न्यायालयात सादर करावेत -फडणवीस

नवी दिल्ली : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्यातील अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने केलेल्या आरोपांचे पुरावे न्यायालयात सादर करावेत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला हाणला. दिल्लीत म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्याक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special court observation while granting bail to the accused of cruise drug case zws
First published on: 28-10-2021 at 03:52 IST