मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मूत्रिपड तपासणीस (रेनल स्कॅन) विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.

हेही वाचा >>> ईडा पिडा टळून राज्यातल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना

त्यानुसार, मलिक यांना १२ सप्टेंबर रोजी घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयात चाचणीसाठी नेण्याचे आदेशही विशेष न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत. मलिकांवर सध्या खासगी रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

या चाचणीसाठी येणारा खर्च मलिक यांच्या कुटुंबीयांकडून केला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मलिक यांची मागणी विशेष न्यायालयाने यापूर्वी फेटाळली. नियमित जामिनाची मागणी करणाऱ्या त्यांच्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित आहे.