मुंबई: बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी शिकवणी वर्गाच्या दोन शिक्षकांनी एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाची वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून कालबद्ध चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)चेतन तुपे यांन औचित्याच्या मुद्यावर बीडमधील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब सभागृहाच्या निदर्शनास आणतांना आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात एका मुलीने हिंमत दाखवत तक्रार दाखल केली असून अशाच प्रकारे आणखी काही मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याचे सांगत सखोल चौकशीची मागणी केली. त्यावर बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण गंभीर असून सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स्थापना करून या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवरही कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.