scorecardresearch

Premium

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार

मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीनिमित्त प्रवाशांसाठी १० विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी – कल्याण, ठाणे, बेलापूरदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

Special local
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीनिमित्त प्रवाशांसाठी १० विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी – कल्याण, ठाणे, बेलापूरदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. मात्र यंदा पनवेलपर्यंत लोकल सेवा उपलब्ध नसल्याने येथील प्रवासी, भाविकांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेवरून सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.४० वाजता सुटून कल्याणला रात्री ३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.३० वाजता सुटेल आणि रात्री ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री ३.२५ वाजता सुटेल आणि पहाटे ४.५५ वाजता कल्याणला पोहोचेल.

air purifier van in navi mumbai, navi mumbai air pollution, air purifier van at vashi and kopar khairane
नवी मुंबई : वायुप्रदूषणावर महापालिकेचा धूळ शमन यंत्राचा उतारा; आठवडाभर वाशी, कोपरखैरणे परिसरात रात्रीच्या वेळी राहणार तैनात
Midnight traffic block at Panvel
पनवेल येथे पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा वाहतूक ब्लॉक
mumbai western railway, mumbai local trains, 8 special local trains, mumbai ganesh visarjan 2023
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या रात्री आठ विशेष लोकल
signal failure, churchgate station, morning, western railway, local services, mumbai central
लोकलच्या ११ फेऱ्या दादरऐवजी परळपर्यंत

हेही वाचा – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये आधुनिक यंत्रणा; एसआयएएस, एडीएएस प्रणालीमुळे संभाव्य अपघात टळणार

कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि रात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाणे येथून रात्री १ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री २ वाजता पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाणे येथून २ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री ३ वाजता पोहोचेल.

हेही वाचा – मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सीएसएमटी – बेलापूर विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.३० वाजता सुटेल आणि बेलापूरला रात्री २.३५ वाजता पोहोचेल. सीएसएमटी – बेलापूर विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.४५ वाजता सुटेल आणि बेलापूरला रात्री ३.५० वाजता पोहोचेल. बेलापूर – सीएसएमटी विशेष लोकल बेलापूरहून रात्री १.१५ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री २.२० वाजता पोहोचेल. बेलापूर – सीएसएमटी विशेष लोकल बेलापूरहून रात्री २ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री ३.०५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special local will run on central railway on anant chaturdashi mumbai print news ssb

First published on: 26-09-2023 at 23:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×