लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नाताळच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे किंवा नववर्ष गोव्याच्या किनारी, कोकणात, दक्षिण भारतात साजरा करण्याचे अनेकांचे नियोजन असते. सलग सुट्ट्यांच्या कालावधीतील गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते करमळी, कोचुवेली आणि पुणे ते करमळी दरम्यान ४८ विशेष रेल्वेगाड्या धावतील. सीएसएमटी-करमळी-सीएसएमटी दैनंदिन विशेष ३४ रेल्वेगाड्या धावतील.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कोणत्या गाड्या, कधी?

गाडी क्रमांक ०११५१ विशेष २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सीएसएमटी येथून दररोज रात्री १२.२० वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ विशेष २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत करमळी येथून दररोज दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवि येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, ११ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेजसह गार्ड्स ब्रेक व्हॅन असे डबे असतील.

आणखी वाचा-त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती

एलटीटी-कोचुवेली – एलटीटी साप्ताहिक विशेष ८ रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक ०१४६३ विशेष एलटीटी येथून १९ डिसेंबर ते ९ जानेवारीपर्यंत दर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि कोचुवेली येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४६४ विशेष २१ डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत दर शनिवारी कोचुवेली येथून सायंकाळी ४.२० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकनबिका रोड, बाय कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, ठोकूर, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायनकुलम आणि कोल्लम येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असे डबे असतील.

आणखी वाचा-मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!

पुणे-करमळी-पुणे साप्ताहिक विशेष ६ रेल्वेगाड्या धावतील

गाडी क्रमांक ०१४०८ विशेष रेल्वेगाडी २५ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत दर बुधवारी पहाटे ५.१० वाजता पुणे येथून सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी रात्री ८.२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४०८ विशेष रेल्वेगाडी २५ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत दर बुधवारी करमळी येथून रात्री १०.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला एक वातानुकूलीत प्रथम श्रेणी, एक द्वितीय वातानुकूलीत, २ तृतीय वातानुकूलीत, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेजसह गार्ड्स ब्रेक व्हॅन असतील. या रेल्वेचे आरक्षण विशेष शुल्कासह १४ डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे दिली.

Story img Loader