मुंबई : स्पाइसजेट कंपनीची विमान वाहतूक मंगळवार 8 सप्टेंबर रोजी सकाळ पासून कोलमडली होती. त्यामुळे मुंबई विमान तळावर प्रवाशाची गर्दी झाली. गेल्या काही दिवसापासून स्पाइसजेटच्या विमानांना वारंवार विलंब होत असल्याने प्रवाशामध्ये नाराजी आहे.

स्पाइसजेट विमानांना वारंवार होणाऱ्या विलंबामागे तांत्रिक बिघाड, विमानांची कमतरता आणि ऑपरेशन्सचे गैरव्यवस्थापन ही प्रमुख कारणे आहेत. नुकत्याच घडलेल्या अनेक घटनांमुळे स्पाइसजेटच्या उड्डाणांना मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे किंवा ती रद्द करावी लागत आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्थिक अडचणींमुळे स्पाइसजेटची अनेक विमाने दीर्घकाळापासून जमिनीवर आहे.

कंपनीकडे सध्या सक्रिय विमानांची संख्या कमी असल्याने, एका विमानाला उशीर झाल्यास त्याचा परिणाम पुढील सर्व नियोजित उड्डाणांवर होतो. यामुळे चेन्नई, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांतील अनेक फेऱ्यांवर परिणाम झाला आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पाइसजेट कंपनी साधारण २० पेक्षा जास्त थेट शहरांसाठी विमानांची उड्डाणे चालवते.