‘माझी वसुंधरा इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर आणि नागपूर या विभागांत ही स्पर्धा होत आहे.

मुंबई : ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘पर्यावरणीय व वातावरण बदल विभाग’ यांनी आयोजित केलेल्या ‘माझी वसुंधरा इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेला’ उत्स्फू र्त प्रतिसाद मिळत आहे. वातावरण बदलाविषयीचे भान आणि करोना संसर्गाविषयीची सजगता गणेशभक्तांमध्ये या वर्षी दिसत असून त्यांनी आपल्या घरगुती गणेशमूर्तीसाठी पर्यावरणस्नेही साहित्याच्या वापरातून आकर्षक सजावट केली आहे.

मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर आणि नागपूर या विभागांत ही स्पर्धा होत आहे. यासाठी विभागवार पारितोषिके आहेत. करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही मूर्ती आणून, साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. प्रदूषणामुळे होणारे नुकसान जाणवत असल्याने नागरिकांमध्ये जागरुकताही वाढली आहे. प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक वस्तूंवर बंदी असल्याने गणेशभक्तांनी सजावटीचे अनेक कल्पक मार्ग शोधले आहेत. याच कल्पकतेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वर्षभरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे, दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करून जलनियोजन आणि व्यवस्थापन करणे, विजेचा अतिरेक टाळणे, घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून खत तयार करणे, टाकाऊ वस्तूंचा कमीतकमी वापर आणि हरित जीवनशैली हीच भविष्यातील समृद्ध निसर्गाची नांदी ठरेल.

सहभागासाठी…

स्पर्धेसाठी तीन ते चार रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात २० सप्टेंबरपर्यंत पाठवावीत. छायाचित्रे तिन्ही बाजूंनी वेगवेगळी घ्यावीत. त्यात गणेशमूर्ती, मखर, इत्यादी स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. छायाचित्र व माहिती loksatta.ecoganesha@gmail.com  या ईमेल आयडीवर पाठवावी. उशिरा मिळालेल्या छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार के ला जाणार नाही. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करावा. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी आणि सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी थोडक्यात जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

पारितोषिके

९ हजार ९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक

६ हजार ६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक

२००१ रुपयांचे विशेष पारितोषिक

विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी संपर्क  : लोकसत्ता ब्रँड विभाग, ७वा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई.

भ्रमणध्वनी क्रमांक – ९७७३१५४९२४.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Spontaneous response to mazi vasundhara eco friendly domestic ganeshotsav competition akp

ताज्या बातम्या