मुंबई: मध्य प्रदेशातील इंदूर येथून महाराष्ट्रात येणारी एसटी महामंडळाची एक बस १८ जुलै रोजी नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. एसटीचालक अन्य गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना हा अपघात झाल्याचे महामंडळाने नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ बस नर्मदा नदीत कोसळली होती. यामध्ये दहा प्रवासी, एसटीचा चालक, वाहकाचा मृत्यू झाला होता. अपघाताची एसटी महामंडळाकडून चौकशी करण्यासाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली होती. या समितीचा प्राथमिक अहवाल सादर झाल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
sharad pawar discussions with congress leaders on five to six disputed seats in maha vikas aghadi
महाविकास आघाडीत अद्याप पाच-सहा जागांवर पेच; शरद पवार, काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा; जागांबाबतचा वाद मिटविण्याचा प्रयत्न
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी
mumbai crime news, person pistol catridges mumbai marathi news, mumbai crime marathi news
मुंबई : पिस्तूल, जिवंत काडतुसांसह सराईत आरोपीला अटक, आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल

एसटी चालक अन्य वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच हा अपघात झाला आहे. एसटी मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने ही बाब बघितली. या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याचे चन्ने यांनी सांगितले.