लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेली पाच ते सहा वर्ष आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस येवू लागले आहेत. एसटी महामंडळाच्या ३१ पैकी २० विभागांनी ऑगस्ट महिन्यात नफा कमवला आहे. एसटी महामंडळाला ऑगस्टमध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. तब्बल ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आल्याने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळाला सातत्याने फायदा होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
mla sada sarvankar effort to waive 26 rent of st space given to women self help group
आर्थिक संकटातील एसटीची आमदारांकडूनच लूट
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”

दोन वर्ष करोना काळ आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. एसटीची वाहतूक सेवा मे २०२२ पासून सुरळीत सुरू झाली. मात्र तत्पूर्वी एसटीकडे मोठ्या संख्येने प्रवाशांनी पाठ फिरवली होती. या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्याचे मोठे आव्हान महामंडळासमोर होते. राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली. सध्या एसटीमधून दररोज सरासरी ५४ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.

आणखी वाचा-राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात ६८ जणांचे मृत्यू , स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सर्वाधिक बळी

याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तिर्थाटन असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच गेली अनेक वर्ष तोट्यात असलेल्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्यात चालणाऱ्या मार्गांवरील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. प्रवासी संख्या अधिक असलेल्या मार्गांवर या बसगाड्या वळविण्यात आल्या. याचबरोबर नादुरुस्ती बसचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निम्याने कमी करण्यात आले. ते १२ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आले. तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करून डिझेलची खपत ०.५२ किमीने वाढविण्यात आली. त्यामुळे डिझेलची बचत झाली. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्टमध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला.

आणखी वाचा-मुंबईः लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करून खंडणीची मागणी

भविष्यात एसटीच्या ताफ्यात स्व:मालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसगाड्या दाखल होणार आहेत. या बसगाड्यांचा योग्य विनियोग, तसेच महामंडळला फायदा व्हावा यासाठी कृतीशील आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे एसटीला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला.