लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या हजारो बस नादुरूस्त असून, या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नादुरूस्त बस अनेकदा रस्त्यात बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये साधरण ५० ते १०० बस ताफ्यात दाखल होणार आहेत.

एसटी महामंडळाच्या १५ हजार ८०० बस सध्या धावत आहेत. मात्र, यापैकी अनेक बस खिळखिळ्या झाल्या असून, या बसमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीने नव्या साध्या डिझेल बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बस ग्रामीण भागातील वाहतुकीच्या दृष्टीने फायद्याच्या ठरतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
IIT mumbai
तेल शुद्धीकरण कारखान्यांतून सोडलेल्या पाण्यामध्येच प्रदूषक नष्ट करणारे जीवाणू; आयआयटी मुंबईतील संशोधकांचे संशोधन
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

हेही वाचा >>>प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

एसटी महामंडळ अशोक लेलँड कंपनीकडून स्वमालकीच्या दोन हजार ५०० डिझेलवर धावणाऱ्या बसगाड्या विकत घेणार आहे. या बसगाड्यांची मुळ प्रतिकृती तयार झाली आहे. तिच्या विविध तपासण्या करून प्रमाणित करण्यात येत आहेत. तिची अंतिम तपासणी १० सप्टेंबर रोजी कंपनीच्या तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) येथील कारखान्यात करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये सुमारे ५० ते १०० बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. तर, नोव्हेंबरपासून १५० ते ३०० बसगाड्या यायला सुरुवात होईल. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार एसटीमधून प्रवास करता येईल, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नव्या १,३१० खासगी एसटीची निविदा प्रक्रिया सुरू

एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावर नव्या एक हजार ३१० बस घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अमरावती, नागपूर येथे नव्या एसटी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी इच्छुकांना निविदा भरण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.