लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी कामगार संयुक्त कृती समितीची एसटी महामंडळ प्रशासनासोबत मंगळवारी बैठक पार पडली. राज्य सरकारसमोर तातडीने हा विषय मांडून, सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मात्र आंदोलनाची भूमिका मागे घ्या, अशी चर्चा बैठकीत झाली. मात्र ठोस निर्णय जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत ९ ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्णय मागे घेणार नसल्याचे ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे.

आणखी वाचा-७/११चा बॉम्बस्फोट खटला : आरोपींच्या अपिलावर लवकरच सुनावणी – उच्च न्यायालय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे, महागाई भत्ता, वाढीव घरभाडे, वार्षिक वेतनवाढ अशा विविध १३ प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व एसटी कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळासोबत एक बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St employees union insists on agitation mumbai print news mrj
Show comments