scorecardresearch

एसटी संप: मुंबईत महिला कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी रोखल्याने अनर्थ टळला

एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे.

ST protest 1
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत असल्याचं आता समोर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगाच निघत नसल्यानं मुंबईत ३-४ संपकरी महिला कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

यावेळी आंदोलनकर्त्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलांना वेळीच रोखल्याने पुढचा अनर्थ टळला. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे.

कामगारांच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे. एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. मागच्या आठ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 11:46 IST

संबंधित बातम्या